आज गणरायाच्या आगमनाचा दिवस आहे. बाप्पाचं आगमन हा प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतात. आनंदाने गणपती बाप्पाचे वाजत- गाजत स्वागत करतात.
ढोल ताशा, फटाके, अगदी जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वजण स्वागत करतात. सार्वजनिक गणेश मंडळे देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. लाडक्या बाप्पाची आज घरोघरी मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा केली जाते.
राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणत घरोघरी गणपती बाप्पाचं आज आगमन होईल.
सार्वजनिक गणेश मंडळे देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. सगळीकडेच पहाटेपासून लगबग पाहायला मिळत आहे.